नवगतांचे स्वागत समारंभ दि. ०१/०९/२०२३

 कोयना एज्युकेशन सोसायटी पाटण संचलित विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर आय. टी. आय कॉलेज ढेबेवाडी येथे शैक्षणिक वर्ष सन 2023-24 प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा कॉलेजच्या वतीने स्वागत समारंभ घेण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य पी एल पाटील सर्व निदेशक वर्ग, सर्व नवीन विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.                      

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. पाटील मॅडम यांनी केले. सर्व निदेशकांनी आपली ओळख करून देऊन आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पालक व विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले, कॉलेजचे प्राचार्य यांनी शिस्त गुणवत्ता व गुणवत्ता वाढी धोरणाविषयी मार्गदर्शन केले.  निदेशक निलेश काळे सर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम ने झाली.