पर्यावरण पूरक जीवनशैली दि. 06/09/2023

  विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी आय. कॉलेज   येथे 2.00 वा. कोयना पर्यावरण  जागृती मोहिमे अंतर्गत “पर्यावरण पूरक जीवनशैली” या विषयावर या महिमेचे समन्वयक मा. सुनील  पानस्कर सर यांनी खूप चांगली माहिती सांगितली, तसेच मा. बोधे सर यानी  हसत पर्यावरण आणि मानवी जीवन यातील  संबंध सांगितले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक पोरे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉलेजची विद्यार्थीनी स्वप्नाली कांबळे हिने केले. सौ. पाटील मॅडम यांनी आभार मानले, यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता वन्दे मातरम् ने झाली.