कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित, विक्रमसिंह रणजीतसिंह पाटणकर आय.टी.आय कॉलेज, ढेबेवाडी येथे ग्रामीण रुग्णालय ढेबेवाडी व आय.टी.आय. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक:17/03/2023 रोजी “व्यसनमुक्ती काळाची गरज” या विषयावर “शिवानी आपटे मॅडम” यांचे व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानाआधी आय.टी.आय कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी “व्यसनमुक्ती काळाची गरज” यावर निबंध स्पर्धेमध्ये व वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला. या व्याख्यानादरम्यान या स्पर्धेमधील प्रथम तीन क्रमांकांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर व्याख्यान मालिकेची सुरुवात सरस्वती पूजन, दीप प्रज्वलानी झाली व त्यानंतर विद्यार्थी मनोगत, आय.टी.आय कॉलेजच्या आदरणीय प्राचार्य पी. एल. पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले, यानंतर शिवानी आपटे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबंधित केले, निदेशक गोणे सर यांनी सूत्रसंचालन तर निदेशक सौ. पाटील मॅडम यांनी आभार मानले., या व्याख्यान माले दरम्यान निदेशक निलेश काळे सर यांच्या संकल्पनेतून साकार झालेले पथनाट्य, व रांगोळी याची उपस्थितांकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आय.टी.आय कॉलेजचे सर्व निदेशक, विद्यार्थी सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.