बेटी बचाओ बेटी पढाओसप्ताह 21/02/2025 ते  28/02/2025   

        आय.टी.आय कॉलेज ढेबेवाडी येथे बेटी बचाओ बेटी पढाओ या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाली यामध्ये आय.टी.आय मध्ये क्रिडा स्पर्धाचे नियोजन केले होते तसेच मानसिक आरोग्य या विषयावर वैशाली यादव मॅडम समुपदेशक यांनी मार्गदर्शन केले.समाजामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ यांची जनजागृतीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी बाईक रॅली काढली.

कोयना एज्युकेशन सोसायटी संचलित, विक्रमसिंह रणजितसिंह पाटणकर आय. टी. आय. कॉलेज ढेबेवाडी येथे ज्ञानसूर्य फाउंडेशन ढेबेवाडी चे अध्यक्ष रवी कांबळे यांनी 26-11-2024  संविधान भेट देऊन विद्यार्थ्यांना संविधान दिवस याबद्दल माहिती दिली, त्यांच्यासोबत नाभिक संघटना पाटण तालुका अध्यक्ष विष्णू सपकाळ, कॉलेजची प्राचार्य सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.